बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांच्या कार्यामध्ये अहिंदूंना सहभागी करून घेऊ नये ! – शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
हरिद्वार (उत्तराखंड) – बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती कायद्यानुसार अहिंदूंना मंदिरांचे बांधकाम, सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण यांसारख्या कामांमध्ये सहभागी करण्यात येऊ नये, अशी मागणी ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केली. .
शंकराचार्य पुढे म्हणाले की, हा कायदा वर्ष १९३९ मध्ये बनवण्यात आला आहे. यात अनेक वेळा सुधारणाही करण्यात आल्या आहेत. या कायद्याद्वारे बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिरांचे व्यवस्थापन केले जाते. यात लिहिण्यात आले आहे, ‘या मंदिरांच्या कोणत्याही कार्यांमध्ये अहिंदूंना सहभागी करता येणार नाही.’ त्यामुळे याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मंदिराचे कार्य अहिंदूंकडून करण्यात येऊ नये.