केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट पहाणार ! – पी.टी. उषा, अध्यक्षा, भारतीय ऑलिंपिक संघटना
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचे प्रकरण
पणजी – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ‘टोकियो ऑलिंपिक’ कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया यांच्यासह महिला कुस्तीपटू देहली येथे जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. या प्रकरणी गोवा भेटीवर असलेल्या भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांना पत्रकारांनी विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘याविषयी केंद्र सरकारच्या निर्णयाची वाट पाहू. केंद्राने यासाठी एक समिती स्थापन केली आहे. कुस्तीपटूंनी आम्हाला संपर्क न करता थेट सरकारला संपर्क केला आहे.’’