समाजवादी पक्षातील धर्मांध नेते आणि त्यांच्याविषयी माजी पोलीस अधिकार्याने केलेले वर्णन
समाजवादी पक्षाचे तत्कालीन सर्वेसर्वा मुलायमसिंग यादव यांच्याकडे ३ दिग्गज नेते होते. गाझीपूरचे माजी खासदार मुख्तार अन्सारी (सध्या अटक असलेले), अलाहाबादचे दिवंगत माजी खासदार अतिक अहमद आणि सिवानचे खासदार शहाबुद्दीन. तिघेही धर्मांध असून उत्तरप्रदेश आणि आसाम येथे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून काम केलेल्या प्रकाशसिंंग यांनी अन्सारीचे वर्णन पुढीलप्रमाणे केले आहे.
‘पूर्व उत्तरप्रदेशच्या ८ आणि त्याच्या शेजारच्या बिहारच्या ४ जिल्ह्यांचा अन्सारी हा राजा आहेे. तेथे कायद्याचे राज्य केवळ कागदावर आहे. गुंतागुंतीच्या आणि अडचणीच्या वेळी जिल्हा दंडाधिकारी (डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट) अन् पोलीस उपअधीक्षक (डि.एस्.पी.) या अन्सारीस शरण जातात आणि त्याचे हुकूम पाळतात. गाझापूर जिल्ह्यांमधील पोलीस ठाण्यांमध्ये रहायचे असेल, तर अन्सारीची चिठ्ठी लागते. त्याने नकार दिला, तर नेमणूक (पोस्टिंग) मिळणे अशक्य ! पोलीस अधीक्षक (एस्.पी.) आणि पोलीस उपअधीक्षक त्याच्या हुकूमाची वाट पहात असतात. पूर्व उत्तरप्रदेशात कुठेही कोणतीही इमारत बांधायची असल्यास कंत्राटदार ठरलेला असतो. मुख्तार अन्सारी याचे शिफारसपत्र असले, तरच तुम्हाला शस्त्र (उदाहरणार्थ पिस्तूल वा बंदूक) वापरता येते.
अन्सारीच्या प्रवासाचा शाही थाट असतो. त्याच्या ताफ्यात ६-७ पांढर्या रंगाच्या ‘क्वालिस’ चारचाकी गाड्या, तैनातीला दिलेले १२ पोलीस आणि २० ते ३० खासगी रक्षक (म्हणजे गुंड) अशा थाटात त्याची तपासणी कोण करणार ? कोणत्याही ठाणे अंमलदाराचे (‘एस्.एच्.ओ.’चे) त्याला पकडण्याचे धारिष्ट्य होत नाही. येथे (पूर्व उत्तरप्रदेशमध्ये) दंगा केल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार झाली होती; पण पोलीसच त्याला पकडण्यास सिद्ध नव्हते. त्याला पकडल्यावर नंतर सोडूनच द्यायचे ना, मग पकडण्याचे कष्ट कशाला घ्या ? तसेच त्याला पकडल्यावर तत्कालीन नेते मुलायमसिंग यांची पुन्हा खप्पा मर्जी (रुसवा-फुगवा) ओढवून घेणे आले. कुणी सांगितली आहे ही डोकेदुखी ? त्याच्या संपत्तीला हात लावण्याच कुणाचेही धारिष्ट्य नाही. त्याला न्यायालयात नेले, तरी तो सुटणार; कारण साक्षीदार मिळणे अशक्य.
अन्सारीसारखीच शहाबुद्दीनची बिहारमध्ये स्थिती आहे. त्याच्यावर ३० पेक्षा अधिक केसेस आहेत, तरी तो व्यवस्थित झोपू शकतो. त्याच्यावर खून, बलात्कार, दरोडेखोेरी आणि परकीय चलनासंबंधीचे अपव्यवहार असे सर्व आरोप आहेत; पण त्याच्याविरुद्ध कुणीही एकही शब्द बोलू शकत नाही. कुणी बोललाच, तर त्याला शहाबुद्दीन हैराण करणार, हे नक्कीच !’’ (अशा धर्मांध नेत्यांवर कारवाई न करता त्याच्या ताटाखालचे मांजर होणार्या पोलिसांवरही कठोर कारवाई व्हायला हवी. मुख्तार अन्सारी आणि शहाबुद्दीन यांच्यासारख्या धर्मांध गुंडांना कठोर शिक्षा करण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक)
(संदर्भ : मासिक ‘धर्मभास्कर’, ऑगस्ट २००७)