छत्रपती संभाजीनगर येथील बामू विद्यापिठातील प्राध्यापकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार !
प्रा. अशोक बंडगरसह पत्नीवर गुन्हा नोंद !
छत्रपती संभाजीनगर – वसतिगृहात रहाणे सुरक्षित नसल्याचे सांगत एका ३० वर्षीय विद्यार्थिनीला घरी ‘पेइंग गेस्ट’ म्हणून रहाण्यासाठी नेऊन तिच्यावर साहाय्यक प्राध्यापकाने बलात्कार केला. अशोक बंडगर असे त्या प्राध्यापकाचे नाव असून तो नाट्यशास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक आहे. या कृत्यात त्याच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पती-पत्नीने संगनमताने मिळून माझ्यावर बेशुद्ध पडेपर्यंत अत्याचार केला आहे, असा धक्कादायक आरोप पीडित मुलीने २५ एप्रिल या दिवशी पोलिसांसमोर केला. त्यानंतर त्याच दिवशी रात्री बंडगर पती-पत्नीवर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Aurangabad. A professor at Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University in Maharashtra’s Aurangabad has been booked for allegedly raping a girl student and harassing her parents for over a year. An […] #News #BreakingNews #WorldNews https://t.co/juSGOH0e4w
— The Eastern Herald (@EasternHerald) April 26, 2023
Dr Babasaheb Ambedkar Marathwada University professor booked on charge of raping student#rape #sexualharassmenthttps://t.co/MY629s9ERq
— Careers360 (@careers360) April 26, 2023
संपादकीय भूमिकाअसे वासनांध प्राध्यापक विद्यार्थ्यांना काय घडवत असणार ? अशा प्राध्यापकांना बडतर्फ करून कठोर शिक्षाच करायला हवी ! |