पुणे येथे पोलीस कर्मचार्याच्या विरुद्ध गुन्हा नोंद !
मद्याच्या नशेत दहशत माजवल्याचे प्रकरण !
पुणे – येथील विश्रांतवाडी भागात करण जाधव या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचार्याने मद्याच्या नशेत दहशत माजवली आहे. भर रस्त्यात तलवार उगारून दहशत माजवणार्या पोलीस कर्मचार्याला निलंबित करण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले. या प्रकरणी पोलीस कर्मचार्याच्या विरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिकाअसे मद्यपी आणि गुन्हेगार पोलीसकायदा आणि सुव्यवस्था कशी राखणार ? |