नाशिक येथे बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाच्या धाडी !
३ सहस्र ३३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !
नाशिक – येथील नामांकित करबुडव्या बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, फार्म हाऊस आणि निवासस्थाने या ठिकाणी आयकर विभागाने घातलेल्या धाडीत ३ सहस्र ३३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
नाशिकमधील बिल्डरांकडे सापडली 3 हजार 333 कोटींची बेहिशेबी मालमत्ता, आयकर विभागाच्या सहा दिवसांच्या कारवाईत मोेठा खुलासा https://t.co/ul5sSHm4bb #Nashik #incometax
— ABP माझा (@abpmajhatv) April 26, 2023
( सौजन्य : abp माझा )
आयकर विभागाची ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. २० एप्रिलच्या पहाटेपासून चालू झालेले हे धाडसत्र सलग ५ दिवस चालले. २५ एप्रिलला हे धाडसत्र थांबवण्यात आले. नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर येथील आयकर विभागाचे २०० हून अधिक अधिकारी अन् कर्मचारी यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली.
६ दिवसांत ५.५ कोटींची रोकड आणि दागिने जप्त !
या धाडसत्रात ५ कोटी ५० लाख रुपयांची रोकड आणि दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. या वेळी पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
२० ते २५ एप्रिल या कालावधीत ९० हून अधिक वाहनांच्या ताफ्यातून आलेल्या या पथकांनी बांधकाम व्यावसायिकांची ४० ते ४५ कार्यालये, बंगले आणि फार्म हाऊसवर धाडी घातल्या.