सभ्यता, संस्कृती आणि हिंदुत्व या दृष्टीने स्त्रियांचे महत्त्व मोठे ! – श्रीमती नंदा डगला, राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य, भाजप महिला मोर्चा, हरियाणा
भारतात पूर्वीपासून प्रत्येक कार्यात स्त्रियांचे योगदान मोठे आहे. सभ्यता, संस्कृती आणि हिंदुत्व या दृष्टीने स्त्रियांचे महत्त्व मोठे आहे. एकीकडे ‘महिलांना शिकण्याचा अधिकार नाही’, अशी गरळओक केली जाते; मात्र वैदिक काळापासून स्त्रिया शिक्षण घेत आहेत, तसेच त्यांची पूजाही केली जाते. तसेच आंदोलनातही महिलांचे योगदान मोठे आहे. परंपरा, वेशभूषा, एकता आणि सभ्यता महिलांमध्ये दिसून येतात.