पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे निधन
२ दिवसांचा राष्ट्रीय दुखवट घोषित
चंडीगड – शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे २५ एप्रिलला सायंकाळी दीर्घ आजारानंतर निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्यावर मोहाली येथील रुग्णालयात उपचार चालू होते. त्यांच्या निधनामुळे केंद्रशासनाने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा घोषित केला आहे.
पूर्व CM प्रकाश सिंह बादल का निधन: पंजाब के 5 बार मुख्यमंत्री रहे; 95 साल की उम्र में ली आखिरी सांसhttps://t.co/Mxya4QzRRe#PrakashSinghBadal #Punjab pic.twitter.com/35L8Slnr5s
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) April 26, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंडीगड येथे जाऊन बादल यांना श्रद्धांजली वाहिली. २७ एप्रिल या दिवशी त्यांच्या पार्थिवावर बादल गावात दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.