नाशिक येथे बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाची धाड !
३ सहस्र ३३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त !
नाशिक – येथील नामांकित करबुडव्या बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, फार्म हाऊस आणि निवासस्थाने या ठिकाणी आयकर विभागाने घातलेल्या धाडीत ३ सहस्र ३३३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाची ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे. २० एप्रिलच्या पहाटेपासून चालू झालेले हे धाडसत्र सलग ५ दिवस चालले. २५ एप्रिलला हे धाडसत्र थांबवण्यात आले. नाशिकसह मुंबई, पुणे, नागपूर आणि संभाजीनगर येथील आयकर विभागाचे २०० हून अधिक अधिकारी अन् कर्मचारी यांनी एकत्रितपणे ही कारवाई केली.
नाशिक शहरात आज भल्या पहाटे आयकर विभागाचे बिल्डर्सवर छापे. संशय येऊ नये म्हणून लढवली शक्कल.#nashik #incometax https://t.co/2P6gIN8fep
— News18Lokmat (@News18lokmat) April 20, 2023