(म्हणे) ‘राष्ट्र’ आणि ‘धर्म’ संकल्पना नष्ट व्हाव्यात ! – भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ साहित्यिक
मुंबई – ‘औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ शहरांचे नामांतर करणारे क्षुद्र लोक आहेत. अशा नामांतराने काही साध्य होणार नाही. राष्ट्र आणि धर्म या संकल्पना नष्ट झाल्या पाहिजेत, असे फुकाचे वक्तव्य ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलेे. (‘औरंगाबाद’ आणि ‘उस्मानाबाद’ यांचे नामांतर करणारे जर क्षुद्र असतील, तर भारतावर आक्रमण करून या भूमीचा आणि संस्कृतीचा विद्ध्वंस करणारे नेमाडे यांना कोण वाटतात ? – संपादक)
भारतात लोकशाही धोक्यात आली असून सत्य बोलणार्याला पोलीस संरक्षणात फिरावे लागते. देशीवाद हा जगभरात स्वीकारला गेला आहे. ज्या मातीतून आपण उगवलो त्या मातीशी कृतज्ञ रहाणे म्हणजे ‘देशीवाद’ आहे. जगभरात उजव्या विचारसरणी वाढीस लागल्याने ‘देशीवाद’ धोक्यात आला आहे. (ज्या मातीचा आणि देशीवादाचा नेमाडे यांना अभिमान वाटतो, त्या मातीची संस्कृती आणि देशीवाद मोगलांच्या आक्रमणाने उद्ध्वस्त झाला, हे नेमाडे यांना लक्षात येऊ नये, हे आश्चर्यच नव्हे काय ? – संपादक) इंग्रजी शाळांमधून शिकणारी मुले पुढे काही होऊ शकत नाहीत. त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव जाणवतो, असे या वेळी भालचंद्र नेमाडे म्हणाले.
संपादकीय भूमिका
|