राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या गोव्यासह ४ राज्यांमध्ये ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ठिकाणांवर धाडी
कुर्टी, फोंडा येथून एकाला कह्यात घेतले
फोंडा, २५ एप्रिल (वार्ता.) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’(‘पी.एफ्.आय.’) या बंदी घातलेल्या संघटनेच्या विरोधात कारवाई करतांना २५ एप्रिल या दिवशी सकाळी गोव्यासह एकूण ४ राज्यांमध्ये धाडी घातल्या. देशभरात बिहार येथे १२, उत्तरप्रदेश येथे २ ठिकाणी, तसेच लुधियाना, पंजाब आणि गोवा येथे प्रत्येकी एका ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. गोव्यात कुर्टी, फोंडा येथे धाड घालून भाड्याच्या घरात रहाणारा महंमद हनिफ एहरार (वय ४२ वर्षे) याला कह्यात घेण्यात आले. या धाडींमध्ये काही आक्षेपार्ह साहित्य आढळले का ? याविषयी माहिती मिळू शकली नाही.
In a massive crackdown on the Popular Front of India, the NIA is conducting raids at multiple locations across Bihar, Uttar Pradesh, Punjab and Goa. (By @aajtakjitendra)https://t.co/WCoLUqqJgp
— IndiaToday (@IndiaToday) April 25, 2023
आसाम पोलिसांनी ८ एप्रिल या दिवशी आसाममधील भरपेटा जिल्ह्यात धाड घालून बंदी घातलेल्या ‘पी.एफ्.आय.’ आणि ‘कँपस फ्रंट ऑफ इंडिया’ यांच्या एकूण ३ नेत्यांना कह्यात घेतले होते. त्यांच्याकडून १ लाख ५० सहस्र रुपये रोख रक्कम, ४ भ्रमणभाष संच आणि ‘सोशल डेमॉक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया’ची (एस्.डी.पी.आय्.ची) पत्रके कह्यात घेण्यात आली होती. या कारवाईनंतर ‘एन्.आय.ए.’ने २५ एप्रिल या दिवशी हे धाडसत्र आरंभले आहे. केंद्राने २८ सप्टेंबर २०२२ या दिवशी ‘यु.ए.पी.ए.’च्या कलम ३ अंतर्गत ‘पी.एफ्.आय.’ आणि तिच्याशी संलग्न इतर संघटना यांच्यावर आतंकवादाला साहाय्य आणि वित्तपुरवठा करणे, तसेच कायदा अन् सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणे, या कारवायांवरून बंदी घातली आहे.
यामध्ये ‘रिहॅब इंडिया फाऊंडेशन (आर्.आय.एफ्.), ‘कँपस फ्रंट ऑफ इंडिया’ (सी.एफ्.आय्.), ऑल इंडिया इमाम कौन्सिल (ए.आय्.आय्.सी.), नॅशनल कॉन्फडरेशन ऑफ ह्युमन राईट्स् ऑर्गनायझेशन (एन्.सी.एच्.आर्.ओ.), ‘नॅशनल वुमेन्स फ्रंट’, ‘एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन’ आणि ‘रिहॅब फाऊंडेशन केरळ’ यांचा समावेश आहे.
कुर्टी येथील नुरानी नागा मशिदीत पूर्वी इमाम म्हणून कार्यरत असलेला मुफ्ती हनिफ महंमद एहरार कह्यात
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) या कारवाईत कुर्टी येथील नुरानी नागा मशिदीत पूर्वी इमाम म्हणून कार्यरत असलेला मुफ्ती हनिफ महंमद एहरार (वय ४२ वर्षे) याला कह्यात घेतले आहे. ही कारवाई पहाटे ४ च्या सुमारास कडक पोलीस बंदोबस्तात करण्यात आली.
CRACKDOWN ON PFI: NIA conducts raid across four states, including Goa https://t.co/K5yxkY5NQf
— Goemkarponn (@goemkarponnlive) April 25, 2023
मुफ्ती हनिफ महंमद एहरार हा गेली काही वर्षे ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित असल्याची माहिती ‘एन्.आय.ए.’ला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. त्याला ४ वर्षांपूर्वी नुरानी मशिद व्यवस्थापनाने कामावरून काढून टाकले होते. तो ‘अखिल गोवा इमाम कौन्सिल’ (ए.जी.आय्.सी.) या संघटनेचा सध्या सरचिटणीस आहे. या संघटनेचा तो पूर्वी अध्यक्षही होता आणि देशभर तो संघटनेची ध्येय-धोरणे मुसलमान समाजात पसरवण्यासाठी फिरत होता, तसेच तो भाषणेही देत होता.