शिबिर संपलेल्या दिवशी ‘सद्गुरु स्वाती खाडये स्वप्नात दिसून त्यांनी आशीर्वाद दिला’, असे दिसणे
‘आमच्या गावी, म्हणजे सोलापूरला २६ ते २८.१.२०२३ या कालावधीत ‘हिंदु राष्ट्र एकता समिती’चे शिबिर होते. त्या वेळी सद्गुरु स्वाती खाडये वक्त्या म्हणून आल्या होत्या. शिबिर संपले, त्या दिवशी रात्री सद्गुरु स्वातीताई माझ्या स्वप्नात आल्या. स्वप्नात त्या एका वटवृक्षाखाली ध्यानस्थ बसलेल्या दिसल्या. मी आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या चरणांपाशी गेलो, तर त्या मला हवेत तरंगतांना दिसल्या. मी त्यांच्याजवळ गेलो. तेव्हा त्यांनी मला आशीर्वाद दिला. त्या माझ्याकडे पाहून हसत होत्या. त्यानंतर ‘पहाट कधी झाली’, हे मला कळलेच नाही.’ – श्री. वैभव गुर्रम, सोलापूर (२६.१.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |