राज्यातील सर्व शासकीय ध्वजारोहणाच्या ठिकाणी अल्पोपहाराची व्यवस्था !
खारघर येथील दुर्घटनेनंतर राज्यशासनाची सावधगिरी !
मुंबई – महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’च्या सोहळ्यात उष्माघातामुळे १४ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर १ मे या दिवशी महाराष्ट्रदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला राज्यातील सर्व शासकीय ध्वजारोहणाला उपस्थित विद्यार्थी आणि नागरिक यांसाठी शासनाकडून अल्पोपहार आणि पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी जिल्हाधिकार्यांना सूचना दिली