सनातनच्या पहिल्या संत प.पू. फडकेआजी यांच्या छायाचित्राकडे पाहून आनंदाची अनुभूती घेणार्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती प्रभावती गजानन शिंदे (वय ८७ वर्षे) !
‘मला २ – ३ वेळा सनातनच्या पहिल्या संत प.पू. विमल फडकेआजी यांची खोली पहाण्याची संधी मिळाली. मी खोलीतील प.पू. फडकेआजींच्या छायाचित्राकडे पाहिल्यावर ‘त्या माझ्याकडे पहात असून माझ्याशी बोलत आहेत’, असे मला वाटते. तेव्हा मला पुष्कळ आनंद होतो. काही वेळा मला त्यांची आठवण आल्यावर लगेचच त्यांचे रूप माझ्या डोळ्यांसमोर येते. मला त्यांचे रूप आठवावे लागत नाही. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला ही अनुभूती आली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती प्रभावती गजानन शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८७ वर्षे) (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या आई), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (९.४.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |