‘वंदे मातरम् शिवोत्सवा’ची सांगता २७ एप्रिलला भव्य ‘शिवगर्जना दुचाकी फेरी’ने होणार ! – नितीन शिंदे
सांगली – राजवाडा चौक येथे ‘वंदे मातरम् शिवोत्सव’ चालू आहे. गेली २१ वर्षे शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून दिलेल्या लढ्याच्या छायाचित्र प्रदर्शनास नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या शिवोत्सवाची सांगली येथे २७ एप्रिलला भव्य ‘शिवगर्जना दुचाकी फेरी’ने होणार आहे. ही फेरी शहरातील प्रमुख मार्गांवरून जाईल, अशी माहिती माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली.
या फेरीत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे नेते मकरंद देशपांडे, भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार, उद्योगपती मनोहर सारडा, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे सहभागी होणार आहेत, तरी सर्व शिवभक्तांनी फेरीत सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन शिंदे आणि नगरसेविका अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे यांनी केले.