छत्रपती संभाजीनगर येथे बनावट धर्मांध वैद्याची आरोग्य विभागात नियुक्ती !
|
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे बी.ए.एम्.एस्.ची बनावट पदवी घेतलेला तरुण वर्ष २०१९ पासून जिल्हा परिषदेत कंत्राटी म्हणून वैद्यकीय अधिकारी पदावर नोकरी करत असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी बनावट वैद्य मोहसीन खान शेरखान पठाण (रा. सिल्लोड) याच्या विरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याने आतापर्यंत १८ लाख रुपये उचलले आहे. ( सौजन्य : abp माझा )
१. वैद्य मोहसीन खान शेरखान पठाण हा वर्ष २०१९ पासून कंत्राटी पद्धतीवर प्रारंभी आमठाणा येथे कार्यरत होता.
२. त्यानंतर ६ एप्रिल २०२२ या दिवशी ११ मासांच्या कंत्राटी पद्धतीवर वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखत दिली आणि त्याची निवडही झाली. नंतर अंधारी (तालुका सिल्लोड) येथे नियुक्ती झाली होती.
३. प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी नेमण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांच्या समितीने उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी केली. त्यात मोहसीन खान याची कागदपत्रे होती, तसेच त्याला अंधारी (तालुका सिल्लोड) येथे नेमणूक मिळाली होती. (कागदपत्रांची छाननी योग्य पद्धतीने झाली नाही का ? कि केली नाही ? हेही पहायला हवे ! – संपादक)
४. सिल्लोड पंचायत समितीच्या तालुका आरोग्य अधिकार्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये जिल्हा परिषदेकडे मोहसीन खान याच्या बनावट पदवीचा प्रताप मांडला होता; मात्र त्या वेळी कोणतीही कारवाई झाली नव्हती. (बनावट पदवीची माहिती देऊनही त्याकडे कानाडोळा करणार्या संबंधित अधिकार्याला बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करायला हवी, तसेच आतापर्यंत मोहसीन पठाण याला दिलेले वेतनही संबंधित अधिकार्यांकडून वसूल केले पाहिजे. – संपादक)
५. पुढे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी पठाण याच्या पदवी प्रमाणपत्राविषयी १७ जानेवारी या दिवशी भारतीय चिकित्सापद्धती राष्ट्रीय आयोग, नवी देहली आणि महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन यांच्याकडे पत्रव्यवहार, ईमेलद्वारे संपर्क केला असता मोहसीन खान पठाण या नावाच्या कोणत्याही व्यक्तीने वर्ष २०११ ते २०२२ या कालावधीत साई आयुर्वेदिक महाविद्यालय, अलिगड येथून बी.ए.एम्.एस्. पदवी प्राप्त केली नाही, असे कळवले, तसेच महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे प्रबंधक डॉ. डी.यू. डांगे यांनीही १९ जानेवारी या दिवशी नोंदवहीत मोहसीन हे नोंदणीकृत नसल्याचे पत्राद्वारे जिल्हा परिषदेला कळवले. त्यानंतर मोहसीन खान यांचा भांडाफोड झाला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले, ‘‘घडलेला प्रकार गंभीर आहे. प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनाकडून गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच यापुढेही चौकशी करून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मला याविषयी समजल्यावर मी तात्काळ प्रशासनाला गुन्हा नोंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.’’ |
संपादकीय भूमिका
|