शरीरसुखाची मागणी करत राजकीय नेत्याची महिलेला गाडीतच बेदम मारहाण !
-
छत्रपती संभाजीनगर येथील घटना !
-
छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !
छत्रपती संभाजीनगर – शहरात शरीरसुखाची मागणी करत एका राजकीय नेत्याने महिलेला चारचाकी गाडीतच बेदम मारहाण केली आहे. माझ्यासमवेत शारीरिक संबंध ठेवले नाही, तर तुला चाकूने भोसकून मारण्याची धमकीही आरोपीने पीडित महिलेला दिली आहे. २२ एप्रिल या दिवशी लक्ष्मी कॉलनी येथील बारापुल्ला प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणी राजकीय नेता जयकिशन कांबळे (रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी) यांच्या विरोधात छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कांबळेवर यापूर्वी बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता. (पहिल्याच गुन्ह्यात आरोपीला कठोर शिक्षा न केल्याने तो पुढचे गुन्हे करण्यास धजावतो. – संपादक)
आरोपी जयकिशन कांबळे हा राजकीय नेता असून तो एका राष्ट्रीय पक्षाशी संबंधित पदाधिकारी होता; मात्र काही दिवसांपूर्वी त्याच्यावर एका महिलेच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. कांबळे याने पीडित विवाहित महिलेला विवाहाचे, तसेच घर देण्याचे आमीष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. ज्यात पीडिता गरोदर राहिली.