मुंबईमध्ये खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणार्या ७ जणांना अटक !
मुंबई – खंडणीसाठी अंधेरी येथील एका हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करणार्या ७ जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनुप शेट्टी असे या व्यावसायिकाचे नाव असून ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून पोलिसांनी त्यांची सुटका केली आहे. शेट्टी यांचे व्यावसायिक भागीदार विजय ओखीरकर यांनीच हे अपहरण घडवून आणल्याचे पोलिसांच्या अन्वेषणातून उघड झाले आहे. व्यावसायिक भागीदारीतून निर्माण झालेल्या वादातून २४ एप्रिल या दिवशी हे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी १३ घंट्यांमध्ये शेट्टी यांची सुटका केली.
संपादकीय भूमिकाअशांना कठोर शिक्षा दिल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |