(म्हणे) ‘पूर्व लद्दाखमध्ये भारत-चीन यांच्यातील संघर्षावर उपाय काढू !’ – चीन

बीजिंग (चीन) – पूर्व लद्दाखमध्ये बर्‍याच कालावधीपासून भारत आणि चीन यांच्यात चालू असलेल्या संघर्षावर लवकरच उपाय काढला जाईल. या दृष्टीने उभय देशांतील वरिष्ठ सैन्याधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली, अशी माहिती चिनी संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे.

प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर शांतता राखण्याच्या सूत्रावरही सैन्याधिकार्‍यांमध्ये चर्चा झाल्याचे यात म्हटले आहे. २३ एप्रिल या दिवशी पूर्व लद्दाखच्या विवादित सूत्रांवर ‘कोर कमांडर’ स्तरावरील १८ व्या दौर्‍यातील चर्चा झाली. २७ आणि २८ एप्रिल या दिवशी शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षणमंत्र्यांची बैठक नवी देहलीत होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर चीनने वक्तव्य जारी केल्याचे म्हटले जात आहे.

संपादकीय भूमिका

कावेबाज चीनच्या या वक्तव्यावर भारताने विश्‍वास न ठेवता त्याच्या विरोधात कायम आक्रमक भूमिका घेणे आवश्यक !