आतंकवाद पसरवणार्या देशाशी संबंध ठेवू शकत नाही ! – परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर
पनामा सिटी – पनामाच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या समवेत घेतलेल्या एका संयुक्त पत्रकार परिषदेत भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. आतंकवाद पसरवणार्या देशाशी संबंध ठेवू शकत नाही, असे जयशंकर यांनी म्हटले आहे. जयशंकर सध्या पनामाच्या दौर्यावर आहेत. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो यांच्या भारत दौर्यापूर्वी त्यांनी हे विधान केले आहे. एस्. जयशंकर पुढे म्हणाले की, सीमापार वाढणारा आतंकवाद संपवायला हवा. आम्हाला आशा आहे की एक दिवस आम्ही तो टप्पा गाठू.
Indian foreign minister S Jaishankar said that it is “very difficult” to engage with a neighbour who practices cross-border terrorismhttps://t.co/QpWwdRQb5y
— WION (@WIONews) April 25, 2023