टोंक (राजस्थान) येथे सशस्त्र धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर क्षुल्लक कारणांवरून आक्रमण : १९ हिंदू घायाळ
टोंक (राजस्थान) – येथील मालपुरा भागात धर्मांध मुसलमानांनी तलवार, लाठी, काठी, फरसे आदींद्वारे हिंदूंवर आक्रमण केले. या आक्रमणात १९ हिंदू घायाळ झाले. त्यांनी हिंदु महिलांचे दागिनेही लुटले. धर्मांधांनी जातांना हिंदूंना धमकी दिली, ‘पोलीस बंदोबस्त ठेवतील आणि २-३ दिवसांनी निघून जातील; मग तुम्हाला कोण वाचवणार ?’ या प्रकरणी पोलिसांनी ३० जणांना अटक केली आहे.
राजस्थान के टोंक में दो समुदायों के बीच जमकर चले फरसा और तलवार, 19 लोग घायल; जानें कैसे शुरू हुआ विवाद#Tonk #Rajasthanhttps://t.co/R2SFNCMqWz
— India TV (@indiatvnews) April 24, 2023
मुसलमान तरुणांनी या भागात दुचाकी चालवत मोठ्या आवाजात हॉर्न वाजवल्याने एका वृद्ध हिंदुने त्यांना जाब विचारला. त्यानंतर २ घंट्यांनी मोठ्या संख्येने सशस्त्र धर्मांध मुसलमान तेथे पोचले आणि त्यांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. यात नथुराम गुर्जर नावाची व्यक्ती गंभीररित्या घायाळ झाली आहे. तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाराजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने तेथे पाकिस्तानी राजवट असल्याचेच अशा घटनांवरून लक्षात येते ! |