उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अज्ञाताकडून ठार करण्याची धमकी
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अज्ञातांकडून ठार करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उत्तरप्रदेशमध्ये आपात्कालीन विभागाने ११२ हा दूरभाष क्रमांक साहाय्यासाठी प्रसारित केला आहे. याच क्रमांकावर एका अज्ञाताने दूरभाष करून धमकी दिली.
UP के सीएम Yogi Adityanath को मिली जान से मारने की धमकी, पुलिस ने केस दर्ज किया#YogiAdityanath #UttarPradesh #UPPolice https://t.co/IiWgXBgi9F
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) April 25, 2023
एक आठवड्यापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
संपादकीय भूमिकाकाँग्रेस, कम्युनिस्ट, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना कधी अशा धमक्या मिळत नाहीत, हे लक्षात घ्या ! |