गाण्यातून भगवान शंकराचा अवमान करणारा रॅप गायक बादशाह याच्याकडून क्षमायाचना
(रॅप म्हणजे अती जलद गाणे गाणारा)
उज्जैन (मध्यप्रदेश) – ‘सनक’ या गाण्याद्वारे भगवान शंकराचा अवमान केल्याच्या प्रकरणी रॅप गायक बादशाह याने क्षमा मागितली आहे. त्याने ‘या गाण्यात पालट करून ते पुन्हा प्रसिद्ध करण्यात येईल’, असे म्हटले आहे. उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराच्या पुजार्यांनी या गाण्यावर आक्षेप घेत पोलिसांत गुन्हा नोंदवण्याची चेतावणी दिली होती. त्यानंतर बादशाह याने ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक माध्यमांतून पोस्ट करत क्षमा मागितली.
सौजन्य झूम
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)