बिहारमध्ये मुसलमान भाडेकरूच्या घरात बाँबचा स्फोट
नवादा (बिहार) – येथील सफीक आलम याच्या घरात २४ एप्रिलच्या रात्री बाँबचा स्फोट होऊन घराचा काही भाग कोसळला. या स्फोटाच्या वेळी घरातील लोक बाहेर झोपलेले असल्यामुळे जीवितहानी झाली नाही. आलम या घरात भाडेकरू म्हणून रहात आहे. या प्रकरणी एका महिलेची चौकशी करण्यात येत आहे.
बिहार के नवादा में सफीक आलम के घर फटा बम, महिला से पूछताछ कर रही पुलिस: यहीं JDU नेता मंजूर आलम के घर मिला था हथियारों का जखीरा#Bihar #bombblast https://t.co/Et0pu7TS4r
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 25, 2023
जनता दल (संयुक्त) पक्षाच्या मुसलमान नेत्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
यापूर्वी २३ एप्रिलच्या दिवशी जनता दल (संयुक्त) पक्षाचा नेता मंजूर आलम याच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी बाँबसह अवैध शस्त्रे जप्त केली होती. पोलिसांनी आलम, त्याचा मुलगा आणि पुतण्या यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ५ बाँब, १ पिस्तूल, ७ गावठी कट्टे, १ रायफल आणि काही जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
बिहार के नवादा में पुलिस ने JDU के पूर्व प्रखंड अध्यक्ष और पार्टी के सक्रिय कार्यकर्ता मंजूर आलम समेत तीन लोगों को गिरफ्तार किया है. #Bihar #JDU #ManzoorAlamhttps://t.co/LUxDORaEPV
— ABP BIHAR (@abpbihar) April 24, 2023
संपादकीय भूमिकाआता जनता दल (संयुक्त) पक्षावर बंदी घालण्याची मागणी का केली जात नाही ? राजकीय पक्षांच्या नेत्यांना शस्त्रसाठा ठेवण्याची सूट आहे का ? |