नेहमी निरोगी आणि उत्साही रहाण्यासाठी शरिराची पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी !
निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १८७
‘शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।’ म्हणजे ‘धर्माचरणासाठी, म्हणजेच साधना करण्यासाठी शरीर हे पुष्कळ महत्त्वाचे साधन आहे.’ शरीर निरोगी असल्यास कोणतीही इष्ट गोष्ट साध्य करणे सोपे जाते. शरीर निरोगी रहाण्यासाठी प्रतिदिन हे करावे.
१. सूर्योदयापूर्वी उठावे आणि रात्री ११ वाजण्यापूर्वी झोपावे.
२. सकाळी उठल्यावर, तसेच खाल्ल्यावर दात स्वच्छ घासावेत.
३. सकाळी रिकाम्या पोटी नियमित १५ मिनिटे तरी व्यायाम करावा.
४. चांगली भूक लागल्यावरच आहार घ्यावा. जेवणाच्या वेळा सोडून अधेमधे खाणे टाळावे.
५. रात्री झोपतांना डोके, तसेच तळपाय यांना खोबरेल तेल लावावे.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.४.२०२३)
लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan