सातबारा उतार्याची प्रत देणारे यंत्र ३ वर्षांहून अधिक काळ धूळखात पडून !
प्रशासनाच्या कारभाराची ऐशीतैशी !
कोल्हापूर – ‘ए.टी.एम्.’ सारख्या दिसणार्या एका यंत्रात काही नाणी टाकल्यावर सामान्य नागरिकांना तात्काळ सात-बारा उतारे मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. ही यंत्रे सुमारे ३ वर्षांपूर्वी काही जिल्हाधिकारी कार्यालयांत बसवण्यात आली होती. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात असणारे हे यंत्र मात्र गेली ३ वर्षे धूळखात पडून आहे. ‘डिजिटल इंडिया’च्या गोष्टी करतांना उत्साहाने चालू केलेल्या अनेक योजना नंतर कशा प्रकारे वार्यावर सोडल्या जातात, याचेच हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल.