गोवा मंत्रीमंडळात १० मेपूर्वी पालट होणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या काही आमदारांना मंत्रीपद मिळणार
पणजी, २४ एप्रिल (वार्ता.) – कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणजेच १० मेपूर्वी गोव्यातील मंत्रीमंडळात पालट केला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलतांना दिली.
गोव्यात 10 मे पुर्वी मंत्रीमंडळात फेरबदल? उरले केवळ दोन आठवडे… मुख्यमंत्र्यांनीच दिले संकेत #Goa #GoaCabinet #CabinetReshuffle #GoaCabinetReshuffle #GoaCM #DrPramodSawant #GoaPolitics https://t.co/EhDdjJ6uhh
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) April 24, 2023
१४ सप्टेंबर २०२२ या दिवशी दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, आलेक्स सिक्वेरा, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, केदार नाईक आणि रूडाल्फ फर्नांडिस या काँग्रेसच्या ८ आमदारांनी भाजपात प्रवेश केला. यामधील काही आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.