परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव येथे झालेल्या ‘हिंदू एकता दिंडी’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त जळगाव येथे १९.५.२०२२ या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. त्या दिंडीत चालत असतांना मला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. ‘दिंडीत सनातनच्या तीनही गुरूंच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या) समवेत सर्व जण चालत आहेत’, असे जाणवणे
‘मला दिंडीच्या आरंभापासूनच सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे पांढर्या शुभ्र वस्त्रातील विराट रूप दिसले. मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे देवीच्या विराट रूपात दर्शन झाले. ‘सनातनचे तीनही गुरु दिंडीतील पालखीच्या पुढे चालत आहेत. त्यांच्या समवेत दिंडीतील सर्व जण चालत आहेत’, असे मला जाणवले.
२. दिंडीत ‘इस्कॉन’चा रथ सहभागी झाला होता. ‘त्या रथातील सिंहासनावर एकीकडे श्रीराम आणि दुसरीकडे श्रीकृष्ण विराजमान आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले.
३. दिंडीतील चैतन्य आणि आनंद अनुभवतांना कृतज्ञताभाव दाटून भावाश्रू येणे
भगवंताने मला या दिंडीतून चैतन्य आणि आनंद पुष्कळ प्रमाणात अनुभवायला दिला. मी हे सर्व अनुभवत असतांना माझा कृतज्ञताभाव पुष्कळ दाटून आला. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊन माझ्या अंगावर रोमांच येत होते. या विशाल चैतन्यदायी दिंडीतून ‘भगवंताचे सूक्ष्मातून कार्य कसे चालू आहे !’, हे मला शिकायला मिळाले.
४. ‘हिंदू एकता दिंडी’ म्हणजे ‘भगवंताने सर्व जिवांवर केलेली कृपा आहे’, असे माझ्या अंतर्मनाला वाटले.
‘श्री गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) कृपेने मला हे सर्व अनुभवायला मिळाले’, त्याबद्दल त्यांच्या पावन श्रीचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. विमल कदवाने (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ५७ वर्षे), ब्रह्मपूर, जळगाव. (२०.५.२०२२)
|