सडक्या सफरचंदांच्या वापरातून सिद्ध केलेल्या रसाची विक्री !
नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील प्रकार !
नवी मुंबई – नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार्यांनी फेकून दिलेल्या सडक्या सफरचंदांचा रस करून तो विकण्यात येत आहे. हे एका व्हिडिओद्वारे उघड झाले. एक तरुण बाजार समितीच्या परिसरात पडलेली सडकी सफरचंद रस करण्यासाठी घेऊन जातो, हे त्याने स्वतः मान्य केले आहे. ती सफरचंद घेऊन त्याचा रस सिद्ध करून पदपथावर बसून किंवा रस्त्यावर जेथे जागा मिळेल, तेथे विकतो. ‘अन्न आणि औषध प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आमच्याकडून केली जाईल’, अशी चेतावणी मनसेकडून देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकापैशांसाठी सडक्या सफरचंदांचा रस काढून विकणे, हे समाजाची नीतिमत्ता खालावल्याचे द्योतक ! नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्या संबंधितांना कठोर शिक्षा करायला हवी ! |