आपत्काळातील संजीवनी असलेला ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड ४ (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् संशोधन)’ !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
१. पित्ताचा पुष्कळ त्रास होऊन झोप न लागल्याने दुसर्या दिवशी थकवा येणे आणि नामजप करण्याचा अन् भावाच्या स्थितीत रहाण्याचा प्रयत्न करूनही अस्वस्थता दूर न होणे
‘३.१.२०२१ या दिवशी रात्री ११.३० वाजता मला पित्ताचा पुष्कळ त्रास होऊन ४ – ५ वेळा उलट्या झाल्या. त्या रात्री मला झोप लागली नाही. त्यामुळे दुसर्या दिवशी मला बराच थकवा आला होता. माझ्या हाता-पायांत त्राण नव्हते. मला सकाळपासून थंडी वाजत होती. मला पडून रहावे लागले. अशा स्थितीत मी नामजप करण्याचा आणि भावाच्या स्थितीत रहाण्याचा प्रयत्न करत होते, तरीही मला अस्वस्थ वाटत होते. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास माझी प्राणशक्ती आणखी न्यून झाली.
२. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड ४ (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् संशोधन)’ या ग्रंथातील प.पू. गुरुदेवांच्या आशीर्वाद देणार्या हाताकडे पाहून नामजप करतांना आलेल्या अनुभूती
२ अ. हलकेपणा जाणवणे आणि शक्ती मिळाल्यासारखे वाटून बरे वाटणे : त्या वेळी चैतन्य मिळण्यासाठी मी पलंगावर ठेवलेल्या ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन खंड ४ (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे सूक्ष्मातील कार्य अन् संशोधन)’ या ग्रंथाकडे माझे लक्ष गेले. मी त्यातील पृष्ठ क्रमांक ३६ वरील प.पू. गुरुदेवांच्या आशीर्वाद देणार्या हाताकडे पाहून नामजप करू लागले. नंतर २ मिनिटांतच मला पुष्कळ घाम आला. मला हलकेपणा जाणवला आणि शक्ती मिळाल्यासारखे वाटून बरे वाटू लागले.
२ आ. ग्रंथातील चैतन्यामुळे आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे : त्या वेळी ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) हा ग्रंथ म्हणजे आपत्काळासाठी संजीवनीच उपलब्ध करून दिली आहे’, असे मला वाटले. ‘परम पूज्यांनी आपल्यासाठी ‘आपत्काळात कोणते आणि कसे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करायचे ?’, याचा आपण विचारही करायला नको’, असे उपाय या ग्रंथाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत’, असेही मला जाणवले. त्या वेळी माझी कृपाळू आणि दयाळू गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.’
– सुश्री (कु.) नलिनी राऊत (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ५८ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.१.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |