रतन टाटा ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !
नवी देहली – जगप्रसिद्ध उद्योगपती आणि ‘टाटा सन्स’चे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ने सन्मानित करण्यात आले. भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत बैरी ओ फैरेल यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली.
फैरेल म्हणाले की, टाटा यांच्या योगदानाने ऑस्ट्रेलियावरही महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंधांच्या दृष्टीने रतन टाटा यांनी अनेक वर्षांपासून दाखवलेली कटीबद्धता पहात त्यांना ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’चा सन्मान प्रदान करण्यात आम्हाला विशेष आनंद होत आहे.
Ratan Tata is a titan of biz, industry & philanthropy not just in 🇮🇳, but his contributions have also made a significant impact in 🇦🇺. Delighted to confer Order of Australia (AO) honour to @RNTata2000 in recognition of his longstanding commitment to the 🇦🇺🇮🇳relationship. @ausgov pic.twitter.com/N7e05sWzpV
— Barry O’Farrell AO (@AusHCIndia) April 22, 2023