शिवमोग्गा (कर्नाटक) येथे हिंदु युवकाच्या हत्येच्या प्रकरणी ४ धर्मांध मुसलमान तरुणांना अटक
शिवमोग्गा (कर्नाटक) – येथील भद्रावती नगरामध्ये २१ एप्रिल या दिवशी नवीन या हिंदु तरुणाच्या हत्येच्या प्रकरणी होसमने पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी सादत, सुहेल, जावेद आणि परवेझ यांना अटक केली आहे.
नवीन याने सादत आणि सुहेल यांना भ्रमणभाष संच विकला होता. त्याचे २ सहस्र रुपये येणे शेष होते. ते घेण्यासाठी नवीन आणि अरुण कुमार हे दोघे त्यांच्याकडे गेले असता त्यांच्यात वाद झाला. त्यातून सादत आणि सुहेल यांनी नवीन याच्यावर प्राणघातक शस्त्राद्वारे आक्रमण केले. यात तो घायाळ झाला. त्याला रुग्णालयात उपचारार्थ भरती केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
संपादकीय भूमिकाकर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना हिंदूंच्या हत्या होणे अपेक्षित नाही ! |