तेलंगाणात भाजपचे सरकार आल्यावर मुसलमानांचे आरक्षण नष्ट करू !
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे रोखठोक प्रतिपादन !
भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणात भाजपचे सरकार आल्यास राज्यात मुसलमानांना देण्यात आलेले आरक्षण रहित करू, असे रोखठोक प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील चेवेल्ला येथे आयोजित सभेला संबोधित करतांना केले.
Let a BJP government be formed in Telangana then we will abolish the unconstitutional reservation for Muslims.
తెలంగాణలో బీజేపీ ప్రభుత్వం ఏర్పాటయ్యాక రాజ్యాంగ విరుద్ధమైన ముస్లిం రిజర్వేషన్లను రద్దు చేసి ఎస్సీ/ఎస్టీ/ఓబీసీలకు వారి హక్కులు తిరిగి ఇస్తాం. pic.twitter.com/gxsoQmaWHp
— Amit Shah (@AmitShah) April 23, 2023
या वेळी शहा म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भ्रष्ट सरकारची उलटगणती चालू झाली आहे. चारचाकी गाडी हे त्यांचा पक्ष असलेल्या भारत राष्ट्र समितीचे निवडणूक चिन्ह आहे. या गाडीचे ‘स्टिअरिंग’ एम्.आय.एम्.कडे (असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाकडे) आहे. याने गाडीची दिशा योग्य असेल का ? हे लोक (असदुद्दीन ओवैसी) भारताचा नकाशा बनवतात आणि त्यात काश्मीरला स्वतंत्र दाखवले जाते.
संपादकीय भूमिकायासमवेतच गृहमंत्री शहा यांनी लवकरात लवकर राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांकांचे चोचले नष्ट करणारा ‘समान नागरी कायदा’ आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असेच राष्ट्रप्रेमी जनतेला वाटते ! |