भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाच्या विरोधात कुस्तीपटूंचे पुन्हा आंदोलन
नवी देहली – भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात भारतीय कुस्तीपटूंनी येथील जंतरमंतरवर २३ एप्रिलपासून उपोषण चालू केले आहे. सर्व कुस्तीपटू रात्री येथील पदपथावरच झोपले. या कुस्तीपटूंमध्ये विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आदींचा समावेश आहे. दुसरीकडे देहली पोलिसांनी खासदार बृजभूषण यांच्यावरील आरोपांची चौकशी चालू केली आहे. बृजभूषण यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप आहे. जानेवारी मासातही या कुस्तीपटूंनी येथे आंदोलन केले होते, तेव्हा ‘समिती स्थापन करून चौकशी करण्यात येईल’, असे केंद्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर चौकशी समितीही स्थापन करण्यात आली; मात्र अद्याप समितीचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे कारवाईही झाली नाही. यामुळेच कुस्तीपटूंनी पुन्हा आंदोलन चालू केले आहे.
पहलवानों ने खुले आसमान के नीचे गुजारी रात, जानिए क्या हैंं डिमांड #WrestlersProtest https://t.co/gAUtafeDKS
— AajTak (@aajtak) April 24, 2023
संपादकीय भूमिकाआंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या कुस्तीपटूंना न्यायासाठी परत परत आंदोलन करावे लागते, हे दुर्दैवी आहे. केंद्र सरकारने यात लक्ष घालून सत्य समोर आणणे आवश्यक ! |