सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्याकडे अदानी समुहाच्या ६ आस्थापनांचे ४५ सहस्र समभाग (शेअर्स) !
हिंडेनबर्ग अहवाल घोषित होण्यापूर्वी मूल्य होते ११.६८ कोटी रुपये, आता आहे २.८४ कोटी रुपये !
छत्रपती संभाजीनगर – हिंडेनबर्ग या अमेरिकेच्या आस्थापनाने अदानी समुहाविषयी सादर केलेल्या अहवालानंतर अदानी समुहाच्या आस्थापनांच्या समभागामध्ये (शेअर्समध्ये) झालेली घसरण सध्या राजकीय वादाचे सूत्र ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार यांच्या कन्या खासदार सौ. सुप्रिया सुळे आणि जावई सदानंद सुळे यांच्याकडे अदानी यांच्या ६ आस्थापनांचे ४५ सहस्र शेअर्स आहेत. हिंडेनबर्ग अहवाल घोषित होण्यापूर्वी या शेअर्सचे मूल्य ११ कोटी ६८ लाख रुपये होते. अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर ते २ कोटी ८४ लाख रुपये झाले आहे. सुप्रिया सुळे यांनी वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीवेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात अदानी आस्थापनाच्या आपल्या कुटुंबाकडे असलेल्या शेअर्सची माहिती दिली होती.
सुप्रिया सुळेंची अदानीच्या कंपन्यांमध्ये किती कोटींची गुतवणूक ?https://t.co/bmbLg0Ey40
— Mumbai Tak (@mumbaitak) April 24, 2023
हिंडेनबर्ग अहवाल प्रकाशित झाल्यानंतर काँग्रेसने देशभर अदानी समुहाच्या विरोधात भूमिका घेतली. ‘अदानी यांच्या कथित शेल आस्थापनांत २० सहस्र कोटी रुपये कुणाचे आहेत ?’, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करून चौकशी करावी’, अशी मागणी लावून धरली होती, तर शरद पवार यांनी जेपीसीची आवश्यकता नसल्याचे सांगून राहुल यांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे विरोध केला. २० एप्रिल या दिवशी यातच गौतम अदानी यांनी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.
काय होता हिंडेनबर्ग अहवाल ?
‘हिंडेनबर्ग रिसर्च’ हे शेअर बाजारातील गुंतवणुकींविषयी अभ्यास करणारे एक अमेरिकी आस्थापन आहे. आस्थापनाच्या अहवालात म्हटले होते की, अदानी समुहाने करदात्यांचा पैसा हडप करून भांडवल उभे केले आहे.