गुंड अतिक अहमद याच्या कार्यालयात आढळले रक्ताचे डाग आणि चाकू !
एखाद्या महिलेची हत्या करून मृतदेह अन्यत्र फेकण्यात आल्याचा संशय
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – कुख्यात गुंड अतिक अहमद याच्या येथील चकिया भागातील निर्जन कार्यालयात सर्वत्र रक्ताचे डाग पडल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच येथे चाकू, साडी, बांगड्या आदी सापडल्याने एखाद्या महिलेची हत्या करून तिचा मृतदेह अन्यत्र टाकण्यात आला असण्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अतीक अहमद के दफ्तर में मिला खून से सना चाकू, साड़ी, अंडरगार्मेंट्स, टूटी चूड़ियाँ… क्या किसी महिला की हुई थी हत्या?#AtiqueAhmed #Prayagraj https://t.co/nqD4toD9Eh
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 24, 2023
या कार्यालयाचा समोरील भाग प्रशासनाने २ वेळा पाडला होता. उर्वरित भाग तसाच ठेवण्यात आला होता.