येशूला भेटण्यासाठी लोकांनी उपाशी राहून स्वतःला दफन करून घेतल्याने ४७ जणांचा मृत्यू !
|
नैरोबी (केनिया) – केनियामध्ये येशूला प्रसन्न करण्यासाठी ‘गुड न्यूज इंटरनॅशनल चर्च’च्या पॉल मॅकेन्झी नावाच्या एका पाद्रयाच्या सांगण्यावरून लोकांनी अनेक दिवस उपवास करत स्वतःला भूमीमध्ये दफन करून घेतल्याने ४७ लोकांचा मृत्यू झाला. यात बालकांचाही समावेश आहे. पोलिसांनी मालिंदी शहरातील जंगलातून आतापर्यंत ४७ मृतदेह शोधून काढले आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाद्रयाला अटक केली आहे. पॉल याने या लोकांना ‘स्वतः भूमीत पुरून घेतल्यास येशूची भेट होईल आणि त्यांना स्वर्गामध्ये स्थान मिळेल’, असेही सांगितले होते.
जीसस से पादरी ने मिलवाने का दिया लालच, महिला-मर्द-बच्चे सबने खाना-पीना छोड़ाः अब तक 47 शव निकले, 800 एकड़ का इलाका सील#JesusChrist #Kenya #Deathhttps://t.co/jsbT3VjG7Q
— ऑपइंडिया (@OpIndia_in) April 24, 2023
पाद्री पॉल याचे म्हणणे आहे की, मी कुणालाही आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नाही. मी वर्ष २०१९ मध्ये चर्च बंद केले होते.
संपादकीय भूमिकाभारतात अशा घटना घडण्यापूर्वीच सरकार आणि प्रशासन यांनी ख्रिस्ती मिशनरी आणि चर्च यांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे ! |