गोवा : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज विकलांगांसाठी ‘व्हीलचेअर सुलभ ई-रिक्शा’चे लोकार्पण होणार
पणजी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ‘सेवा, सुशासन आणि जनकल्याण’ उपक्रमाचा भाग म्हणून पणजी येथील मिनेझिस ब्रागांझा येथे २४ एप्रिलला ‘व्हीलचेअर सुलभ ई-रिक्शा’ ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. राज्य दिव्यांग आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी ही माहिती दिली आहे.
आयुक्त गुरुप्रसाद पावसकर पुढे म्हणाले,
‘‘विकलांग व्यक्तीचा प्रवास सुलभ करण्यासाठी आयोगाच्या वतीने ‘व्हीलचेअर सुलभ ई-रिक्शा’ सेवेला प्रारंभ करण्यात येत आहे. या सेवेचे व्यवस्थापन ‘व्हीलचेअर टॅक्सीसेवा’मध्ये अग्रणी असलेल्या ‘ईझी मूव्ह’ या आस्थापनाद्वारे करण्यात येत आहे.
E Rickshaw : दिव्यांगांसाठी ई-रिक्षा सुविधा; प्रवास सुलभ#Goanews #ERickshaw #Marathinews #Dainikgomantak https://t.co/xZdQkPb6tC
— Dainik Gomantak TV (@GomantakDainik) April 23, 2023
विकलांगांना कामाचे ठिकाण, रुग्णालये, शाळा आणि इतर ठिकाणी प्रवास करण्यासाठी या सुविधेचा लाभ होणार आहे. या रिक्शाचा मागचा दरवाजा ‘रॅम्प’मध्ये रूपांतरित होत असल्याने विकलांगांना रिक्शात चढ-उतार करणे सुलभ होणार आहे.’’