केरळमध्ये अध्यात्मप्रसार करतांना साधिकेला आलेले कटू अनुभव
१. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रसार करतांना येणार्या अडचणी
वर्ष २०१२ मध्ये एका मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला होता. तेव्हा आम्ही मंदिराजवळच्या घरांमध्ये प्रसाराला जाऊ लागलो. तेव्हा लक्षात आले की, मंदिराच्या जवळची बहुतांश घरे धर्मांधांची होती; पण घराबाहेर तुळशी वृंदावन किंवा काही घरांची नावे हिंदूंचीच होती. त्यामुळे प्रसार करतांना हे अहिंदूंचे घर आहे कि नाही ? हे कळायला मार्ग नव्हता. धर्मांधांनी हिंदूंकडून घर विकत किंवा भाड्याने घेतले होते; पण त्यानंतर त्यांनी घराचे नाव पालटले नव्हते किंवा तुळशी वृंदावन तसेच ठेवले होते. त्यामुळे प्रसार करायला अडचणी येऊ लागल्या.
२. मंदिराजवळची बहुतांश दुकाने आणि उपाहारगृहे धर्मांधांची असणे
केरळ राज्यातील एका प्रसिद्ध मंदिराजवळची बहुतांश दुकाने धर्मांधांचीच आहेत. तिथे बहुतेक छोटी उपाहारगृहे आहेत. त्यांची नावे हिंदु देवता किंवा हिंदूंचीच आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर भक्त हिंदूंचे उपाहारगृह समजून तिथे खातात. ते उपाहारगृह अहिंदूंचे आहे, हे लक्षातही येत नाही. अशा रितीने हिंदूंना फसवले जाते.
३. शबरीमला येथे जाणार्या भक्तांची गर्दी वाढवण्यासाठी मांसाहारी उपाहारगृहात शाकाहारी भोजन बनवणे
शबरीमला येथे जातांना किंवा येतांना भक्त वाटेवर असणार्या उपाहारगृहात जेवतात. त्या वेळी भक्तांची गर्दी अधिक असते. आम्ही पोन्कुन्नम नावाच्या एका गावात काही वर्षांपूर्वी प्रसाराला गेलो असतांना लक्षात आले की, तिथे एक मांसाहारी उपाहारगृह आहे; पण शबरीमला यात्रेच्या कालावधीत तेथे हिंदु भक्तांची गर्दी वाढवण्यासाठी शुद्ध शाकाहारी भोजन बनते.
४. एका हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अध्यात्मप्रसाराला विरोध करणे
वर्ष २०१० मध्ये कोट्टयम् जिल्ह्यात एका प्रवचनासाठी एक साधक आणि साधिका गेले होते. तेव्हा तेथील एका हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असा प्रचार केला, ‘हे आतंकवादी संघटनेचे कार्यकर्ते आहेत.’ कुणी हिंदु धर्माचा प्रसार करायला आले असतांना त्यांना प्रोत्साहन देणे किंवा साहाय्य न करता त्यांना विरोध करणारे हिंदु संघटनेचे कार्यकर्ते पहायला मिळाले.
५. केरळमध्ये सनातन संस्थेचा अपप्रचार केला जात असल्याचे हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून कळणे
काही मासांपूर्वी एका जिल्ह्यात एक आंतरराष्ट्रीय पुस्तकोत्सव झाला. त्यात सनातन संस्थेच्या ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याच्या बाजूला अन्य एका हिंदु संघटनेचे प्रदर्शन होते. त्यातील कार्यकर्त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या साधकांशी ओळख करून घेतली आणि कार्य जाणून घेतले. सनातन संस्थेच्या कार्याची व्याप्ती कळल्यावर ते साधकांना म्हणाले, ‘‘आम्हाला तुमचे कार्य आणि त्याची मोठी व्याप्ती कळाली. आम्ही तुमच्या संस्थेला आतापर्यंत एक ‘आतंकवादी संघटना’ म्हणून ओळखत होतो.’’ यावरून ‘सनातन संस्थेविषयी केरळ राज्यात अपप्रचार केला जातो’, हे लक्षात आले.
६. केरळमध्ये ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाला हिंदु व्यक्तीने विरोध करणे
सनातन संस्थेकडून घेतल्या जात असलेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगातील एक जिज्ञासू एका बाहेरच्या ‘व्हॉट्सअॅप’ गटामध्ये आहेत. संस्थेकडून मल्याळम् भाषेतील एक लिखाण सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित केले होते. त्यात ‘हिंदु राष्ट्र’ हा शब्द घातला होता. ते लिखाण त्या जिज्ञासूंनी अन्य एका ‘व्हॉट्सअॅप’ गटामध्ये प्रसारित केल्यावर त्यांना त्या गटामधील अनेकांनी पुष्कळ विरोध केला. या गटाचे ‘अॅडमिन’ (मुख्य व्यक्ती) हे हिंदु आहेत. त्या गटामध्ये इतर पंथीयही आहेत. गटाचे मुख्य म्हणाले, ‘‘अशा प्रकारचे लिखाण या गटामध्ये चालणार नाही.’’ त्या लिखाणाविषयी इतर पंथीय काहीही म्हणाले नाहीत; पण एका हिंदूनेच त्या लिखाणाला विरोध केला. तसेच काही वर्षांपूर्वी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रसारासाठी ‘हिंदु राष्ट्र’ असे लिहिलेले फलक रस्त्यावर लावले होते. त्या वेळीही कुणीतरी पोलिसांकडे तक्रार केली होती.
७. सनातनच्या ‘संस्कार वही’वरील ‘अफझलखानवधाच्या चित्रा’मुळेे पोलिसांनी गुन्हा नोंदवणे
काही वर्षांपूर्वी कासरगोड जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी शाळेतील मुलांना देण्याकरता सनातनची वही विकत घेतली. त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केल्याचे चित्र होते. ते बघून एका धर्मांधाने पोलिसांकडे तक्रार केली आणि वही घेणार्या धर्मप्रेमीवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.
८. गुरुपौर्णिमेसारख्या धार्मिक कार्यक्रमांविषयी आलेले कटू अनुभव
अ. केरळमध्ये झालेल्या काही गुरुपौर्णिमा महोत्सवांमध्ये बर्याच वेळा पोलीस येतात. एका गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात तर ८ पोलीस उपस्थित होते. गुरुपौर्णिमा कार्यक्रमात गुरूंचे महत्त्व, हिंदु धर्माचे महत्त्व, साधना इत्यादी माहिती सांगणारे प्रवचन असते. तरीही अशा धार्मिक कार्यक्रमांची चौकशी करायला पोलीस उपस्थित असतात. (आतंकवादी संघटनांवर नव्हे, तर धर्मप्रसार करणार्या संस्थेच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणारे पोलीस ! – संपादक)
आ. एका गुरुपौर्णिमेच्या वार्तांकनासाठी आपण धर्मांध पत्रकारांना निमंत्रित केले नव्हते. तरीही २ धर्मांध पत्रकार बळजोरीने कार्यक्रमस्थळी आले. त्यांनी प्रसिद्धीपत्रक खेचून नेले. त्यांची माहितीसाठी एका कागदावर लिहून घेतलेली नावे त्यांनी खोडली. त्यानंतर त्या पत्रकारांनी त्यांच्या दैनिकात सनातनविषयी चुकीची आणि आक्षेपार्ह माहिती छापली.
– कु. अदिती सुखटणकर, केरळ. (एप्रिल २०२३)
साधक, धर्मप्रेमी आणि वाचक यांना विनंती !या लेखात म्हटल्याप्रमाणे धर्मप्रसार करतांना कुणाला अशा प्रकारचे काही कटू अनुभव आले असल्यास त्यांनी नजीकच्या दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात पाठवावेत, ही विनंती ! |