श्री वज्रेश्वरी योगिनीदेवी संस्थानच्या पर्यवेक्षकपदी ख्रिस्त्याची नेमणूक करणार्या उत्तरदायींची नावे उघड करा !
‘भिवंडी येथील ऐतिहासिक श्री वज्रेश्वरी योगिनीदेवी संस्थानच्या पर्यवेक्षकपदी (‘सुपरवायझर’पदी) फ्रान्सिस जोसेफ लेमोस या ख्रिस्ती व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली होती. हा निर्णय १५ एप्रिल २०२३ पर्यंत रहित न केल्यास २३ एप्रिल २०२३ या दिवशी मंदिराच्या प्रांगणात आंदोलन करण्याची चेतावणी ‘शंभुदुर्ग प्रतिष्ठान’कडून देण्यात आली; मात्र यामुळे धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण होण्याचा बागुलबुवा निर्माण करून पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.’ (२०.४.२०२३)