‘बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावा’, असे प्रशासनाला सांगावे का लागते ? त्यांना स्वतःला कळत कसे नाही ?
‘देवगड तालुक्यातील ‘पडेल कँटीन’ परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे बसवण्याची सूचना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी वनविभागाला केली आहे. ‘या परिसरात ३ बिबटे फिरत आहेत. यापूर्वी अनेकांना हे बिबटे दिसले असून यातील एक बिबट्या दबा धरून दुचाकीस्वारांचा पाठलाग करतो आणि आक्रमण करतो. यामुळे पुरळ, वाडा, पडेल कँटीन या परिसरात रात्रीचे फिरणे धोकादायक झाले आहे’, असे ग्रामस्थांनी आमदार राणे यांच्या निदर्शनास आणून दिले.’ (२०.४.२०२३)