निवडणुकीच्या हस्तपत्रकात देवतांच्या चित्राचा उपयोग केल्यावरून समाजवादी पक्षाच्या उमेदवारावर आचारसंहितेच्या भंगाचा गुन्हा नोंद !
सोरब (कर्नाटक) – सोरब विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाकडून उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेल्या व्ही.जी. परशुराम यांच्या विरुद्ध सोरब पोलीस ठाण्यात आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. व्ही.जी. परशुराम यांनी उमेदवारी अर्ज भरण्यास जातांना मिरवणूक काढली होती. त्या वेळी त्यांनी वाटलेल्या हस्तपत्रकांमध्ये श्री रेणुकांबा आणि परमेश्वर या देवतांची चित्रे प्रसिद्ध केली होती. निवडणुकीमध्ये देवतांच्या चित्रांचा वापर करणे आचारसंहितेच्या विरोधात असल्याने परशुराम यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.