नमाजाच्या आडून हे तर शक्तीप्रदर्शन !
जयपूर-देहली महामार्गावर ईदच्या दिवशी रस्त्यावर मुसलमानांनी नमाजपठण केले. त्यामुळे ५ किलोमीटर इतका रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. याविषयी प्रसारित झालेल्या काही व्हिडिओंमध्ये उपस्थितांची संख्या पाहिली, तर इराक अथवा सीरियामध्ये हे चालू आहे कि काय ? असे वाटेल; मात्र ते भारतातच घडत आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. मेरठच्या (उत्तरप्रदेश) ईदगाह चौराह येथेही रस्ता बंद करून नमाजपठण करण्यात आले. मुख्य म्हणजे भारतात अनेक ठिकाणी नमाजपठणाचे असे प्रकार केवळ ईदच नाही, तर अन्य दिवशीही घडतात. त्याच्या बातम्या आणि व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित होतात, काही लोक प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि पुढे काही होत नाही.
मुसलमानांची हुकूमत !
भारतात नमाजपठणासाठी मशिदींचा विचार केला, तर त्यांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत काही भागांमध्ये अधिक आहे. वेरावळ आणि प्रयागराज जंक्शन या रेल्वेस्थानकांच्या फलाटांवरच मशिदी आहेत. देहली येथील जामा मशिदीच्या ड्रोन छायाचित्रकाद्वारे काढलेल्या छायाचित्रांमध्ये मशिदीच्या आतील बाजूस आणि परिसरात पुष्कळ रिकामी जागा दिसते, तरीही मोठ्या संख्येने मुसलमान धर्मीय मशिदीच्या शेजारील रस्त्यावर नमाजपठण करतांना दिसतात. उत्तर भारतातील एका राज्यामध्ये एका निवासी संकुलात असलेल्या मोकळ्या जागेत नमाजपठण चालू होते. त्याला रहिवाशांनी आक्षेप घेऊन आणि पोलीस ठाण्यात तक्रार करण्यापर्यंत विषय गेल्यावरच ते बंद झाले. जम्मू-काश्मीर येथील मार्तंड सूर्य मंदिरात हिंदूंना पूजा करण्यास भारतीय पुरातत्व विभागाने नकार दिला होता; मात्र तेथे ईदच्या दिवशी धर्मांधांनी फटाके फोडले.
मुसलमानांना नमाजपठण करायचे आहे कि त्याआड शक्तीप्रदर्शन करायचे आहे ? तसेच प्रशासन, पोलीस यांनी त्यांच्या या कृतीला काहीच आक्षेप घेतला नाही; कारण ते आक्षेप घेणार नाहीत, याची त्यांनाही निश्चिती आहे. त्यामुळे समूह शक्तीच्या जोरावर हे सर्व चालू आहे, हे बहुसंख्य हिंदूंना लक्षात येते. भारतात मुसलमान केवळ नावाला अल्पसंख्यांक आहेत. येथे तर त्यांचा मनमानीपणा सर्रास चालू असतो आणि कुणी त्याला आक्षेप घेतला, तर समाजाच्या मोठ्या शक्तीच्या जोरावर हाणामारी करण्यास ते मोकळे ! रामनवमी, हनुमान जयंती किंवा अन्य धार्मिक उत्सव यांच्या वेळी मशिदीच्या जवळून मिरवणुका नेल्या, तरी धर्मांधांना ते सहन होत नाही आणि ते मिरवणुकांवर दगडफेक करतात, दुकानांना आगी लावतात, मूर्तीची विटंबना करतात. दुसर्या शब्दांमध्ये केवळ मशीदच नाही, तर आसपासच्या परिसरावरही त्यांचीच ‘हुकूमत’ चालते, हे त्यांना लक्षात आणून द्यायचे आहे, असे दिसते.
रमझानमध्येच गुन्हे
एकीकडे ‘रमझानचा पवित्र मास चालू असल्याने मुसलमान काही अनुचित करणार नाहीत’, असे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना वाटते; मात्र रोजे (उपवास) चालू असतांना दिनाजपूर (बंगाल) येथे अल्पवयीन हिंदु मुलीवर तिचा धर्मांध मित्र आणि त्याचे अन्य मित्र यांनी सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. बंगाल पोलिसांनी तिचा मृतदेह तलावाबाहेर काढून तो अक्षरश: रस्त्यावरून ओढत नेला. एका मुलीचा, जिच्यावर धर्मांधांनी सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केली आहे, तिचा देह असा घेऊन जाण्याची बंगाल पोलिसांची काय मानसिकता आहे ? मृतदेह कसा हाताळायचा, याचे प्रशिक्षण पोलिसांना नाही का ? ‘ही बंगाल पोलिसांची केवळ अमानवीयता नसून हिंदूंविषयीची घृणाच आहे’, असे हिंदूंना वाटते. रमझानच्या मासातच बिहार येथे शुक्रवारच्या नमाजानंतर ‘अतीक-अश्रफ अमर रहे, योगी मुर्दाबाद’, अशा घोषणा देण्यात आल्या. केरळमध्ये एका धर्मांधाने रेल्वे पेटवून काही प्रवाशांची हत्या केली.
सध्या एक विज्ञापन प्रसारित करण्यात येत आहे. एक मुसलमान युवक नमाजपठण करतांना साडी नेसलेली हिंदु मुलगी त्याच्या जवळ येते. तेव्हा तो तिला पंजाबी पोशाख देतो, नंतरच्या दृश्यांमध्ये ‘तो तिची टिकली काढतो आणि डोक्यावर पदर घेण्यास सांगून नंतर तो तिला स्वीकारतो’, असे दाखवण्यात आले आहे. हे विज्ञापन आताच का प्रदर्शित करण्यात आले ? यातून धर्मांधांना ‘ईदच्या काळात हिंदु मुलींना प्रेमपाशात अडकवून त्यांचे धर्मांतर करा’, असा संदेश द्यायचा आहे का ?
मुसलमान धर्मीय विद्वान डॉ. सय्यद रिझवान यांनी सांगितले की, मुसलमानांना हे विचारले पाहिजे की, रस्त्यावर येऊन नमाजपठण का केले जाते ? दुसर्या एका विचारवंतांनी सांगितले, ‘‘भारतात एवढ्या मोठ्या संख्यने मुसलमान ईद साजरी करत आहेत, तर कुणी हिंदू त्याला आक्षेप घेतांना किंवा सण साजरा करण्यास आडकाठी करतांना दिसत आहे का ?
हिंदूंच्या उत्सवांच्या वेळी मात्र तसे होत नाही. भारतातील मुसलमान विद्वान, विचारवंत यांना तसे वाटते. अरब आणि अन्य मुसलमान देश यांना मात्र ‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे वाटते.’’
वक्फच्या जागेवर नमाजपठण का नाही ?
वक्फ बोर्डाकडे आज ८ लाखांहून अधिक एकर भूमी आहे. मुसलमानांना जागा अल्प पडत असेल, तर ते ईदचे नमाजपठण वक्फच्या भूमीवर का करत नाहीत ? हिंदूंचे लाखोंच्या संख्येत होणारे सामूहिक सोहळे, उत्सव हे मैदानावर होतात, कुठला रस्ता अडवून होत नाहीत. नमाजपठणाच्या नावाखाली रस्त्यावर येऊन शक्तीप्रदर्शन, हिंदु मुलींवर अत्याचार, त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न आणि गुन्हे करणे, हे हिंदूंवरील विविध आघातच आहेत. हे प्रकार आताच रोखले नाहीत, तर उद्या हिंदूंना चालणे-फिरणे आणि रहाणेही कठीण होईल, हे लक्षात घेऊन प्रशासन अन् पोलीस यांनी त्यावर अंकुश ठेवून मुसलमानांना जाणीव करून देणे आवश्यक आहे !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात रस्ते अडवून नमाजपठण करणे, हे धार्मिक नसून शक्तीप्रदर्शनच आहे, असेच हिंदूंना वाटते ! |