पुणे येथे बंदुकीचा धाक दाखवत धर्मांधाने केला महिलेवर अत्याचार !
पुणे – व्यवसायात गुंतवलेले ४ कोटी परत मागण्यासाठी गेल्यावर जुगनू उपाख्य शफीक शेखने बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केला, तसेच या घटनेचा ‘व्हिडिओ’ बनवून महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आहे. (अत्याचार करून वर ठार मारण्याची धमकी देणारे उद्दाम धर्मांध ! – संपादक) हा प्रकार पुण्यातील कोंढवा परिसरात घडला आहे. या प्रकरणी ४८ वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीवरून कोंढवा पोलिसांनी जुगनू उपाख्य शफीक शेख याच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार आणि आरोपी जुगनू शेख हे दोघे एकमेकांच्या ओळखीने वर्ष २०२० मध्ये भिशीचा व्यवसाय करत होते. तो बंद झाल्यामुळे आरोपींनी दुसर्या व्यवसायासाठी तक्रारदार आणि त्यांच्या मैत्रिणीकडून वेळोवेळी ४ कोटी रुपये घेतले; परंतु त्यांना काहीही पैसे न देता आर्थिक फसवणूक केली.
संपादकीय भूमिकापुन्हा कुणी असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा द्यायला हवी, तसेच महिलांनीही अशा नराधमांना धडा शिकवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन रणरागिणी बनून उभे रहायला हवे ! |