काश्मीरमधील १ सहस्र ३०० वर्षे प्राचीन मार्तंड सूर्य मंदिरात ईदनिमित्त फोडण्यात आले फटाके !
मुसलमान मुलांनी केलेल्या कृत्यानंतर पुरातत्व विभाग मात्र गप्प
अनंतनाग (जम्मू-काश्मीर) – येथील १ सहस्र ३०० वर्षे प्राचीन असलेल्या मार्तंड सूर्य मंदिरात ईदनिमित्त फटाके फोडल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून त्यामध्ये फटाके फोडणारे हे मुसलमान मुले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
Firecrackers have been bursted at Martand Sun Mandir in Jammu & Kashmir on Eid. pic.twitter.com/LWwXXy4bVH
— Treeni (@_treeni) April 23, 2023
या मंदिराला भारतीय पुरातत्व विभागाकडून ‘संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले असले, तरी ही घटना समोर आल्यानंतरही विभागाकडून यासंदर्भात कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. याआधी मंदिरामध्ये हिंदूंनी पूजा करण्याच्या प्रयत्नांवरून विभागाने आक्षेप घेतला होता. (पूजा केलेले पुरातत्व विभागाला चालत नाही; मात्र मंदिरात फटाके फोडलेले चालते का ? हिंदुद्वेष्ट्या भारतीय पुरातत्व विभागाचा निषेध ! – संपादक)
मार्तंड सूर्य मंदिराचा इतिहास !ललितादित्य मुक्तापीड नावाच्या गौरवशाली हिंदु राजाने ८ व्या शतकात मंदिराची उभारणी केली असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या जवळ ८४ लहान मंदिरे होती. मार्तंड सूर्य मंदिराची भव्यता एवढी होती की, अलौकिक विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पीशी त्याची तुलना केली जात होती. ललितादित्य याचे शासन हे मध्य आशियापासून ईराण आणि भारत येथपर्यंत विस्तारित होते. त्याच्यानंतरच्या राजांचे सामर्थ्य मात्र अल्प होत गेले. त्यामुळे इस्लामी आक्रमकांनी वेळोवेळी मार्तंड मंदिरावर आक्रमणे केली. १५ व्या शतकात मुसलमानांच्या एका सैन्याने या मंदिरावर चाल केली. मंदिराला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी या सैन्याला संपूर्ण एक वर्ष लागले. यातून या मंदिराच्या भव्यतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. आता या मंदिराचे केवळ अवशेषच शिल्लक राहिले आहेत. |
संपादकीय भूमिका
|