बंगालमध्ये पोलिसांनी बलात्कारित तरुणीचा मृतदेह रस्त्यावरून फरफटत नेला !
|
उत्तर दिनाजपूर (बंगाल) – येथे एका अल्पवयीन हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या झाल्याच्या घटनेनंतर येथे हिंसाचार झाला. मृत पीडितेचा मृतदेह नेत असतांना गावकर्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या वेळी पोलिसांनी लाठीमार आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांकडून मृत पीडितेचा मृतदेह फरफटत नेला जात असल्याचा व्हिडिओ २२ एप्रिल या दिवशी प्रसारित झाला होता. भाजपचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी हा व्हिडिओ ट्वीट केला होता.
पश्चिम बंगाल: “उत्तर दिनाजपुर जिले में पुलिस ने लड़की का शव सड़क पर घसीटा, पूरी टीम पर ग्रामीणों ने फेंके पत्थर, परिवार ने कहा- रेप के बाद हुई हत्या।”
BJP ने कहा- पुलिस जल्दबाजी में सबूत मिटाने की कोशिश कर रही है।#WestBengal #UttarDinajpur pic.twitter.com/P3zgFVg4Pk
— The Hint News (@TheHintNews) April 23, 2023
पोलिसांच्या म्हणण्यानुसार मुलीच्या शवविच्छेदनानुसार तिने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जावेद नावाच्या तरुणाला अटक केली आहे. मुलगी आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. भाजपच्या स्थानिक खासदार देबाश्री चौधरी यांनी या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे राज्याच्या महिला आणि बाल विकास अन् समाज कल्याण मंत्री डॉ. शशि पंजा यांनी आरोप केला की, भाजपचे नेते जनतेला भ्रमित करून चिथावणी देत आहेत.
Despite having a Women CM in West Bengal, the body of a minor of Rape victim girl is being dragged in such a Cruel, barbaric way, such evil act by Bengal police & it’s political leadership…. it’s darkness all over Bengal.
— Oxomiya Jiyori 🇮🇳 (@SouleFacts) April 22, 2023
१. पोलिसांचे म्हणणे आहे की, मुलगी बेपत्ता होती; मात्र तिच्या कुटुंबियांनी याविषयी कोणतीही तक्रार केली नव्हती. त्यानंतर या मुलीचा मृतदेह कालव्यामध्ये सापडला. पोलीस जेव्हा मृतदेह घेण्यास गेले असता त्यांच्यावर लोकांकडून दगडफेक करण्यात आली.
बंगाल में लड़की का शव पुलिस ने सड़क पर घसीटा, ग्रामीणों ने पत्थर फेंके, परिवार का आरोप- रेप के बाद हत्या की गईhttps://t.co/zmWwZChtNs pic.twitter.com/1rhL8VBIDM
— samachar 24 (@samachar24) April 23, 2023
२. बंगालमधील भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी म्हटले की, आम्हाला पीडितेच्या कुटुंबियांना भेटू दिले नाही. आम्हाला पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले.
सरकारकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही ! – राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो
या संदर्भात राष्ट्रीय बाल संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी ट्वीट करून म्हटले की, मुलीवर सामूहिक बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी पीडितेचा मृतदेहाचा अवमान केला आहे. राज्य सरकारला या संदर्भात सूचित केल्यानंतर सरकारकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.
संपादकीय भूमिका
|