(म्हणे) ‘मुख्यमंत्री झालो, तर मुसलमानांना पुन्हा ४ टक्के आरक्षण देईन !-काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांचे आश्‍वासन !

बेंगळुरू (कर्नाटक) – मी पुन्हा मुख्यमंत्री झालो, तर मुसलमानांना ४ टक्के आरक्षण देईन. तसेच ‘अमूल दूध खरेदी करू नये’, असा राज्याच्या जनतेला आदेश देईन, असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले. ‘अमूल’ आस्थापनाने राज्यात प्रवेश केल्याने नंदिनी दूध उत्पादनांना आणि त्यावर आधारीत आमच्या शेतकर्‍यांना त्रास होईल’, असेही ते म्हणाले.

भाजप सरकारने काही दिवसांपूर्वी मुसलमानांना असणारे ४ टक्के आरक्षण रहित केले होते. ‘भाजपने हे आरक्षण रहित करून ते लिंगायत आणि शेतकरी यांना दिले आहे’, असा आरोपही सिद्धरामय्या यांनी केला.

संपादकीय भूमिका

  • एकीकडे ‘भारत निधर्मी देश आहे’ असे सांगत हिंदूंना कोणतीही सवलत देण्यास विरोध करायचा आणि दुसरीकडे त्याच निधर्मी देशात मुसलमानांना सर्व सोयीसुविधा पुरवायच्या, त्यासाठी घटनाद्रोह करायचा, हेच काँग्रेसने आतापर्यंत केले असल्याने हिंदूंनी तिला केंद्रातील सत्तेतून हाकलून लावले आहे, तरीही तिला अणि तिच्या नेत्यांना त्याची जाणीव झालेली नाही, हेच सिद्धरामय्या यांच्या विधानातून लक्षात येते !
  • अशा पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना कर्नाटकातील धर्माभिमानी हिंदू जागा दाखवल्याविना रहाणार नाहीत !