ज्ञानवापीमध्ये शिवलिंग सापडलेल्या ठिकाणी वजू करण्याची अनुमती देता येणार नाही !
उत्तरप्रदेशातील भाजप सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका
(वजू म्हणजे नमाजपठणापूर्वी हात-पाय धुणे)
वाराणसी (उत्तरप्रदेश) – ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाजवळ वजू करण्याच्या मुसलमान पक्षाच्या मागणीला उत्तरप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयात विरोध केला आहे. या संदर्भात न्यायालयाने मशीद आणि मंदिर पक्ष यांना जिल्हाधिकार्यांसमेवत बैठक घेऊन निर्णय घेण्यास सांगितले होते; मात्र या बैठकीत कोणताही निर्णय होऊ शकला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने आता वाराणसी जिल्हाधिकार्यांना नमाजपठण करणार्यांना पाणी आणि शौचालय यांची व्यवस्था करण्याचा आदेश दिला.
‘Provide water and tub for Vaju in Gyanvapi..’, Supreme Court order to DM https://t.co/ZxgqjJZ2mV To Get all latest news and updates Join us on WHATSAPP group https://t.co/9JQObwuDqx https://t.co/fqwLQW5dBB
— News track English (@newstrack_eng) April 21, 2023