पैठणबाजार (छत्रपती संभाजीनगर) समितीच्या निवडणुकीत गोंधळ !
काँग्रेसच्या २ गटांत जोरदार हाणामारी !
पैठण – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून गोंधळ होऊन काँग्रेसच्या २ गटांत जोरदार हाणामारी झाली आहे. या घटनेमध्ये १ जण गंभीर घायाळ झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. (अशी काँग्रेस बाजार समितीचा कारभार नीट पाहील का ? – संपादक)
१. या निवडणुकीमध्ये काँग्रेसमध्येच गटबाजी झाल्याने २ गट सिद्ध झाले आहेत. यामध्ये १ गट महाविकास आघाडीसमवेत आहे, तर दुसरा गट स्वतंत्र पॅनल सिद्ध करून निवडणुकीत उतरला आहे. हे दोन्ही गट समोरासमोर येत त्यांच्यामध्ये वादावादी झाली.
२. यात प्रचारासाठी ‘शेतकरी विकास परिवर्तन पॅनल’चे उमेदवार बाबासाहेब पवार, निवृत्ती पोकळे आणि ज्ञानेश्वर पवार हे इंदेगाव येथे गेले होते. त्या वेळी दोन्ही गटांत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. काँग्रेसचे विनोद तांबे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्या समर्थकांनी धारदार शस्त्राने आक्रमण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.