मुंबईमध्ये तस्करांकडून २१ कोटी रुपयांचे सोने जप्त !
सोने तस्करांना वेळच्या वेळी कठोर शिक्षा न केल्यानेच असे प्रकार वारंवार घडत आहेत !
मुंबई – महसूल गुप्तचर संचालनालयाने सोन्याची तस्करी करणार्या पिता-पुत्राला झवेरी बाजार येथे अटक केली आहे. धर्मराज भोसले आणि त्यांचा मुलगा सूरज भोसले अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २१ कोटी रुपयांचे ३५ किलो सोने, तर २ कोटी ३ लाख रुपये इतकी रक्कम कह्यात घेण्यात आली आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाने २० एप्रिल या दिवशी कार्यालयावर धाड टाकून ही कारवाई केली. महसूल गुप्तचर संचालनालय हे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ याचा एक भाग आहे. सीमा शुल्क बुडवणार्यांवर या संचालनालयाकडून कारवाई केली जाते. महसूल गुप्तचर संचालनालयाची देशभरात १२ कार्यालये असून त्यांतील एक कार्यालय मुंबई येथे आहे.